जालना / नगर सह्याद्री
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमीका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा ८ जून पासून उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं सांगत सरकारवार जोरदार निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, सरकारच्या वतीने अजून कुणीही भेटायला आलेलं नाही.काय होतंय, ते बघू या. मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली आहे. परळी बंदची हाक, अश्लील स्टेटस तसं करायला नको. कुणाचेही स्टेटस ठेऊ नका. निवडणुकीआधी देखील मी हेच सांगितलं आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले, सर्वांनी शेतीची कामे करा. अंतरवालीत येऊ नका, मी लढण्यासाठी खंबीर आहे. सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना पहिल्या खपक्यातच समाज पाडेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.