PM Modi Property: पीएम मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे अर्धा डझन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाराणसीतून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपूर्ण संपत्तीचा तपशील दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच 2019 च्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी एकूण संपत्ती 2 कोटी 51 लाख रुपये असल्याचे घोषित केले होते. 2014 च्या निवडणुकीत मोदींनी आपली संपत्ती 1 कोटी 65 लाख दाखवली होती. 10 वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत अंदाजे 1 कोटी 37 लाख 6 हजार 889 रुपयांनी वाढ झाली आहे.
बँक खात्यात 80 हजार रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, सध्या त्यांच्याकडे जवळपास 52,920 रुपये रोख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत 73,304 रुपये आणि वाराणसी शाखेत 7000 रुपये उपलब्ध आहेत.
2.85 कोटींची मुदत ठेव
पीएम नरेंद्र मोदी यांच्या नावावर स्टेट बँक (SBI) मध्ये 2.85 कोटी रुपयांची FD देखील आहे. याशिवाय त्यांच्याकडे 9,12,398 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देखील आहे.
पीएम मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या
पीएम मोदींनी त्यांच्या शपथपत्रात सांगितले की, त्यांच्याकडे एकूण 45 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्याची किंमत जवळपास 2.67 लाख रुपये आहे.