spot_img
ब्रेकिंगभुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; लोणावळ्यात लागू होणार 'संचारबंदी

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; लोणावळ्यात लागू होणार ‘संचारबंदी

spot_img

पुणे। नगर सहयाद्री:-
लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर तसेच कारवाईत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केले आहे.

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरुणी येतात आणि रात्री गोंधळ घालण्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करतात. पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिस कारवाई करतील.

रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीत देखील अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. लोणावळा, मावळ परिसरातील धरणांमध्ये खोलीचा अंदाज न आल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...