पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती / ११ लाख ८८ हजार शेतक-यांना होणार लाभ
रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला
शिर्डी / नगर सह्याद्री
महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतक-यांना ११२९.३७ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपणी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार असून, आत्तापर्यंत २६४.२३ कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने शेतक-यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरु केली. याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यातील ११ लाख ८८ हजार शेतक-यांना सहभाग नोंदविला होता. मंध्यतरी झालेला अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात आली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, पीक कापणी प्रयोग आधारित एकुण ११२९.३७ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजुर झालेली असून, ही रक्कम शेतक-यांना शेतक-यांच्या खात्यात सर्व अडथळे आता दुर झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपलब्ध होणा-या विमा रक्कमचे आकडे पुढील प्रमाणे अकोले तालुका ४७.३६७ कोटी, संगमनेर १२८.९८ कोटी, राहाता १२१.२२ कोटी, श्रीरामपूर ६९.५६ कोटी, नेवासा ८७.९४ कोटी, कोपरगाव ७९.५९ कोटी, राहुली १०३.३५ कोटी, पाथर्डी ७५.६४ कोटी, पारनेर १२३.०१ कोटी, नगर ६५.५३ कोटी, शेवगाव ९.७७ कोटी, श्रीगोंदा ४८.७८ कोटी, कर्जत ९३.८५ कोटी, जामखेड ७४.५१ कोटी रुपये इतकी भरपाई मंजुर झाली आहे .
जिल्ह्यातील शेतक-यांना भरपाई मिळण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून, विमा कंपनी व राज्य शासना मार्फत विमा रक्कमेचा उर्वरित निधी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
एक रुपयात पीक विमा योजना सुरु करणारे महाराष्ट्र एकमेव
एक रुपयात पीक विमा योजना सुरु करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या योजनेच्या माध्यमातून सरकारची आहे. यापुर्वी २५ टक्के अग्रीम रक्कम देवून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित रक्कमही मंजुर झाल्याने या नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना लवकरच उपलब्ध होईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.