पुणे । नगर सहयाद्री
राज्यातील नागरिकांसाठी आता एक गोड बातमी आहे. राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत राज्य सरकारकडुन जीआर / शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६० कोटींच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आलीय.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडुन मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधा वाटप होत असल्याची टीका विरोधक करत आहे.
गौरी गणपती उत्सवानिनित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे.