spot_img
अहमदनगरगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज! ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह..

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज! ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता होणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यात विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नगर शहरातही मुख्य विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे. यंदा मनाच्या १२ गणेश मंडळांसह १७ मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत केल्या जाणार्‍या विद्युत रोषणाईत ’लेझर शो’वर निर्बंध घालण्यात आले आहेत. मिरवणुकीत लेझर लाईट्स वापल्यास त्या जप्त करण्यात येणार आहेत. याबाबत सर्व गणेश मंडळांना कोतवाली पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

यंदाच्या मिरवणुकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत. त्यातच माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखालील स्पंदन प्रतिष्ठान १३ वर्षांनंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मिरवणुकीत डीजेसह विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यात लेझर लाईटचा वापर होण्याची शयता असल्याने कोतवाली पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३(१) अन्वये लेझर लाइट्स वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा मंडळांना दिला आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणूक मार्गावर बॅरिकेटिंग करून विसर्जन मार्गाला जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्वस्तिक चौक येथे एका बाजूचा रस्ता बंद मंडप उभारणार्‍या गणेश मंडळांना रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते. याकडे दुर्लक्ष केल्याने जनजागृती मित्र मंडळ व राजयोग प्रतिष्ठान या दोन मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर व मंडप व्यावसायिकांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १०२/११७ अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जनजागृती मंडळाचे प्रमुख व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, मंडप व्यावसायिक अतिष रोहिदास राऊत, राजयोग मंडळाचे राहुल चव्हाण व मंडप व्यावसायिक प्रसाद संजय आकुबत्तीन यांच्यावर कारवाईसाठी कोतवाली पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दिला आहे.

शहरातील ३९७ जणांवर हद्दपारीची कारवाई
विसर्जन मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने नगर शहरातील ३९७ जणांवर हद्दपारीची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १०७, तोफखाना १७० व भिंगार हद्दीतील १२० जणांना मिरवणूक काळात शहरात येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी बंदोबस्त
पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपअधीक्षक, 37 पोलीस निरीक्षक, 63 सहाय्यक व उपनिरीक्षक, 1535 पोलीस कर्मचारी, 947 होमगार्ड, ‘आरसीपी’च्या तीन तुकड्या, ‘क्यूआरटी’च्या दोन तुकड्या, ‘एसआरपीएफ’ची एक कंपनी, ‘आरएएफ’ची एक कंपनी, स्ट्रगींग फोर्स 10, साध्या वेशातील पोलीस पथके, छेडछाड विरोधी पथक, ध्वनीप्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे.

मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज!
नगर शहरात मुख्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगर शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन उपअधीक्षक, 9 पोलीस निरीक्षक, 31 सहायक व उपनिरीक्षक, 530 पोलीस अंमलदार, 255 होमगार्ड, ‘एसआरपीएफ’चीे एक तुकडी व ‘आरसीपी’ची एक तुकडी तैनात केली आहे.

बाप्पांच्या विर्सजनासाठी १७ ठिकाणी व्यवस्था
बाळाजी बुवा विहीर (नगर कल्याण रोड), यशोदानगर विहीर (सावेडी पाईपलाईन रोड, साईनगर), बुरुडगावरोड येथील आरसीसी हौद (भोसले आखाडा), गांधी नगर (भारत बेकरी चौक, बोल्हेगाव), साईबाबा मंदिर खुली जागा (निर्मलनगर), गंगा उद्यान (मिस्कीन मळा सावेडी), कल्याण रोड व सीना नदी येथील आयुर्वेद उद्यानातील मोकळी जागा, देवी मंदिरासमोरील जागा (केडगाव), भुषणनगर (पाण्याच्या टाकीजवळ केडगाव), सारसनगर (भिंगार नाला पुलाशेजारी), शिवनेरी चौक (स्टेशन रोड), गोविंदपुरा, फकीरवाडा (मारुती मंदिरजवळ), भिस्तबाग महालजवळ (दोन ठिकाणी) गांधी मैदान पटांगण, पांजरपोळ पटांगण (मार्केट यार्ड), दाणेडबरा, मोतीनगर खुली जागा (केडगाव), यशोदा नगर विहिरी शेजारी, नालेगाव बाळाजीबुआ विहिरी शेजारी, आंबेडकर सांस्कृतिक भवन (केडगाव देवी रोड).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...