प्रतिमेस जोडे मारून शहर भाजपचा वतीने निषेध
अहमदनगर। नगर सहयाद्री
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. चवदार तळ्या सारख्या पवित्र ठिकाणी त्यांची प्रतिमा फाडून जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा अपमान केला आहे. आमच्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. स्टंटबाजी करून मीडियात झळकण्याची आव्हाडांची सवयच आहे. आधी अपमान करायचा व टीका झाल्यावर कातडी बचावासाठी माफी मागायची हे निंदनीय आहे.
जितेंद्र आव्हाडांची मानसिकता विकृत प्रकारची आहे. अशा विकृत माणसावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. येणाऱ्या काळात राष्टपुरुषांचा कोणीही अपमान करण्याचे धाडस करू नये यासाठी जितेंद्र आव्हाडांवर कडक कलमे लावून कठोर कायदेशीर कारवाई करावी. समाजाला लागलेली ही विकृत किड वेळीच ठेचली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांवर शासनाने कडक कायदेशीर कारवीची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यानी दिला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचा निषेध आज सकाळी शहर भाजपच्या वतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारून ती पायदळी तुडवून नंतर तिचे दहन भाजपच्या वतीने करून त्या घटनेचा निषेध केला. यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या मुर्दाबाद च्या जोरदार घोषणा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिल्या. जितेंद्र आव्हाडांना तातडीने अटक करावी व त्याच्यावर कायम स्वरूपी भाषणाची बंदी आणावी अशी मागणीही यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शहर भाजपचे सरचिटणीस प्रशांत मुथा, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, पंडित वाघमारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राहुल जामगावकर, महेश नामदे, मयूर बोचूघोळ, महेश गुगळे, अशोक गायकवाड, गोकुळ काळे, नितीन उदमले, प्रज्योत लुणिया, गोपाल वर्मा चंद्रकांत दारुणकर, वैभव झोटिंग, राजेंद्र काळे, राज शेलार, संदीप जाधव, सुनील तावरे, संदीप पवार, सुनील सकट, नरेश चव्हाण, सुनील उमाप, मीरा सरोदे, सुरज गोहेल, अनिरुद्ध घैसास, शाम बोळे, अजय ढोणे, दत्ता गाडळकर, उमेश शिर्के, महेश शिर्के, प्रदीप परदेशी, नामदेव अडागळे, प्रवीण ढोणे, नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी डापसे, अनिल ढवण, विशाल नाकाडे, राहुल रासकर आणि शरद तपासे, सतीश शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीनेही आव्हाड यांचा निषेध नोंदवला.