spot_img
ब्रेकिंगGold Silver Price Today: सोने-चांदीच्या किंमतीत घसरण? 14 ते 24 कॅरेटचा भाव...

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या किंमतीत घसरण? 14 ते 24 कॅरेटचा भाव पहा एका क्लिकवर..

spot_img

Gold Silver Price Today: जून महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यात 22 जून रोजी सोने आणि चांदी दणकावून आपटले होते. त्यानंतर सोने-चांदीच्या किंमतीत किंमतीत घसरण झाली आहे. काय आहेत आता भाव?

गेल्या आठवड्यात सोन्याने 21 जूनला 810 रुपयांची उसळी घेतली. तर 22 जून रोजी किंमती 870 रुपयांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात 24 जून रोजी किंमतीत 150 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी भाव स्थिर होता. बुधवारी सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात अखरेच्या सत्रात चांदीत 3000 रुपयांची वाढ झाली नि दुसर्‍या दिवशी 2000 रुपयांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला 24 जून रोजी चांदी 300 तर 25 जून रोजी 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांची घसरण झाली. बुधवारी सकाळच्या सत्रात चांदी 100 रुपयांनी उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा 10 ग्रॅमचा भाव?
24 कॅरेट सोने 71,739 रुपये,
23 कॅरेट 71,452 रुपये,
22 कॅरेट सोने 65,713 रुपये झाले.
18 कॅरेट 53,804 रुपये,
14 कॅरेट सोने 41,967 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...