श्रीगोंदा । नगर सहयाद्री
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ यांच्या संयोजनाने ५ जून जागतिक पर्यावरण दिनी सकाळी १० वा.राळेगणसिद्धी ता.पारनेर येथे मंडळाचे प्रेरणास्थान जेष्ठ समाजसेवक ‘पद्मभूषण’ डॉ. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे जयंती आणि पर्यावरण कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याची माहीती पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी दिली.
५ जून रोजी होणाऱ्या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम पत्रिका राळेगणसिद्धी येथे थोर समाजसेवक ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांना प्रदान करून पर्यावरण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे , जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, महीला जिल्हाध्यक्षा लतिका पवार, पर्यावरण मंडळ सदस्य आशाताई कांबळे आदिंसह पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे उपस्थित राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, चंद्रकांत शिंदे ॲड.प्रभाकर तावरे, संजय देवरे, प्रभाकर म्हस्के, आदि मान्यवर पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पर्यावरण मंडळाचे जेष्ठ सदस्य विलास महाडीक, यांचा सेवापृतिचा सन्मान सोहळा कार्यक्रम होणार आहे.तरी पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी व पर्यावरण प्रेमींनी कार्यक्रमासाठी आपली नाव नोंदणी अध्यक्ष महोदय याकडे करावी तसेच स्व.आबासाहेब मोरे यांची जयंती व पर्यावरण कार्यकर्ता मेळावा कर्यक्रमास पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.