अहमदनगर । नगर सहयाद्री-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुर्योदय युथ ग्रुप खंडाळा यांच्यावतीने देण्यात आली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शनिवार दि. १३ एप्रिल रोजी रात्री ११.५० वा केक कापण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला.
रविवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. सोमवार दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता लहान मुलासाठी डान्स स्पर्धेसह स्नेहभोजन तसेच मंगलवार दि. १६ एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.