[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
अहमदनगर / नगर सह्याद्री –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त निघणा-या मिरवणुकांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर राहणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
आज अहमदनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जंयती निमीत्त मिरवणुका निघणार आहेत. मिरवणुकीत एकुण १८ मंडळांची सहभाग घेतलेला आहे. सदरची मिरवणुक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासुन नियमित मिरवणुक मार्गाने दिल्ली गेट येथे जाणार आहे. सदर मिरणुकांसाठी पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असुन ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. मुख्य रत्यावर बॅरेकेटींग करण्यात आलेली आहे.
मिरवणुक मार्गावर तसेच मिरवणुक मार्गाचे आजुबाजुला अजुन बारकाईने लक्ष राहवे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बाधित राहण्यासाठी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे संकल्पनेतुन, अपर पोलीस अधिक्षक अहमदनग, उपविभागिय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संबधीत मिरवणुक मार्ग व आजुबाजुचा परिसराचे व्हीडीओ चित्रकरण करण्याचे अनुषंगाने ड्रोन कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तरी पोलीस विभागा मार्फत अवाहन करण्यात आलेले आहे की, कोणीही कायदा व सुव्यवस्था बाधित करणार नाही केल्यास त्यांचेवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.