Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच हवामानात सातत्याने बदल पहावयास मिळाला आहे. कुठे प्रचंड उष्णता तर कुठे मुसळधार पावसाच्या धारा. दरम्यान आज पुन्हा राज्यात पुढील २४ तासामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तसेच काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.