spot_img
ब्रेकिंग'मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका'

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

spot_img

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला
सोलापूर | नगर सह्याद्री

स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये आणि महाराष्ट्राचा मणिपूर करू नये असं वक्तव्य बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून केलं. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर तसे सांगावे. मात्र समाजाला झुलवणे बंद करावे असा टोला आमदार राऊत यांनी लगावला.

सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही त्यांनी मनोज जरांगे यांना लगावला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.
मी बार्शीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो. सत्ता आल्यानंतर मी एकनाथ शिंदें सोबत असलो तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलेली आहे असं राजेंद्र राऊत म्हणाले. कोणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये. मराठा समाजाची फसवणूक न करता योग्य मार्गाने न्याय द्या असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला. मी मराठा समाजाबद्दल एखादा विचार मांडला तर कोणाला राग यायचे काय कारण? जरांगे कोणती बाजू घेतात ते सर्वांना माहीत आहेत. आता मी माझी बाजू स्पष्ट केलेली असून आता त्यांनी आमदारांकडून विशेष अधिवेशनासाठी पत्र घ्यावीत असा आवाहन ही राऊत यांनी केले.
सर्वच पक्षांनी जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा अशी ही मागणी राजेंद्र राऊत यांनी केली.

मराठा विरोधी भूमिका मांडणार्‍याच्या विरोधात मतदान करा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत त्यांच्या विरोधात सर्व मराठा समाजाने मतदान करावे असे आवाहन राऊत यांनी केले. यानंतरच प्रत्येक पक्षाची अंधारातील भूमिका आणि खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल. मी हेच फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे. बहुतांश सर्व पक्षांना आणि आमदारांना माझी पत्र गेली असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिवेशन घेण्यासाठी पत्र पाठवायचे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...