spot_img
अहमदनगरतुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज? खासदार अमोल कोल्हेंच्या डायलॉगबाजीला मंत्री विखे पाटलांच...

तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज? खासदार अमोल कोल्हेंच्या डायलॉगबाजीला मंत्री विखे पाटलांच जोरदार प्रत्युत्तर

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते पक्षाच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरले आहे. निलेश लंके यांच्यासाठी जाहीर सभा घेतलेल्या खासदार अमोल कोल्हेंच्या डायलॉगबाजीला जोरदार प्रत्युत्तर देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला.

अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी शरद पवार, शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या जाहीर सभेने तर राजकीय वातावरण तापवले आहे.

तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद मोदी यांची दुपारी एक वाजता विराट जाहीर सभा होणार आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेत असतांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या नगरमध्ये चौथ्यांदा आगमन होणार आहे. जनता मोदींची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक सभेस उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे उद्याची होणारी जाहीर सभा ही रेकॉर्डब्रेक सभा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार अमोल कोल्हेंच्या डायलॉगबाजीला जोरदार प्रत्युत्तर देत मंत्री विखे पाटील म्हणाले, हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी कोल्हेंना टोला लगावला आहे. तसेच, लोक गुंडाराजच्या विरोधात मतदान करणार असल्याचंही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...