spot_img
ब्रेकिंगमराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

spot_img

संभाजीनगर | नगर सह्याद्री

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तसेच सगेसोयर्‍यांच्या अंमलबजावणीसाठी दिलेला अल्टीमेटम संपला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा कडक इशारा दिला असून मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका असे सांगत आम्ही राजकारणात येणार नाही. आलो तर १०० टक्के २८८ जण पाडणार. राज्यात पॉवर मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे. मराठ्यांच्या मतावरत आताचे आमदार झालेत, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तसेच सगेसोयर्‍यांच्या अंमलबजावणीबाबत दिलेलाल अल्टिमेटम शनिवारी (दि.१३) संपला. त्यामुळे जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेणार? कोणती रणनिती ठरवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार्‍या शांतता रॅलीआधी ते माध्यमांशी बोलत होते.

सरकारशी बोलणं झालं नाही. आजचा पूर्ण दिवस दिलेला आहे. सरकार काय करत आज बघू. आजचा दिवस बोलता येणार नाही. पुढचा दौरा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. विरोध केला तरी आम्ही अंमलबजावणी घेणार आहे. मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच बैठकीला विरोधकांनी जायला पाहिजे होते. नाही आले म्हणजे तुम्ही त्यांच कारण सांगणार का आम्हाला? ते बैठकीला नाही आले म्हणजे आमचा बळी घेणार का? असा सवाल करत मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका.

एकदा निर्णय घेतला तर सुफडा साफ होईल, असा थेट इशाराही मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, मी तुम्हाला सावध करतोय. आम्ही राजकारणात येणार नाही. आलो तर १०० टक्के २८८ जण पाडणार. राज्यात पॉवर मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे. मराठ्यांच्या मतावरत आताचे आमदार झालेत, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी यावेळी केली

सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर अख्खी मुंबई जाम करू; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारलाइशारा
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला अल्टिमेटम दिला होता. शनिवारी अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली आहे. ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असतांनाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला आहे.

सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले, तर मुंबई जाम करू, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात. आम्ही ६० टक्के ओबीसीने तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती देखील हाके यांनी केली आहे.इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकार पुढील अडचणी वाढण्याची शयता आहे.लक्ष्मण हाके म्हणाले, बीड येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे राहून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या अठरा पगड जातीचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणार्‍या भुजबळ साहेबांवर कोणी अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरून टीका करत असेल, तर आम्ही महाराष्ट्रातील सगळी माणसे एकत्रित येऊन त्याचा निषेध करू.मनोज जरांगे पाटील यांना २८८ जागा लढवायच्या असतील तर त्यांनी लढवून बघाव्यात, असे आव्हान देखील हाके यांनी दिलंय. महाराष्ट्राची सुसंस्कृत ओळख पुसायचे काम करणारे अनेक हिटलर होऊन गेले. मात्र इथली जनता सुज्ञ आहे, असं म्हणत हाके यांनी जरागेंवर शाब्दिक हल्ला चढवला.दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचा शब्द दिल्याचं मनोज जरांगे सांगत आहेत. त्यामुळे सगेसोयरेंबाबत मुख्यमंत्र्यांना हा अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असताना आता ओबीसी समाजाने दिलेल्या हा इशार्‍यामुळे सरकार मोठा पेच उभा राहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...