spot_img
अहमदनगरParner News: डांगोरा पिटणार्‍यानो समोर बसून चर्चा करा! मळगंगा ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण...

Parner News: डांगोरा पिटणार्‍यानो समोर बसून चर्चा करा! मळगंगा ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा, ‘यांच्या’ आक्रमक भाषणाची चर्चा

spot_img

निघोज | नगर सह्याद्री- मळगंगा ग्रामीण ट्रस्ट, मळगंगा सहकारी पतसंस्थेचा कारभार स्वच्छ असून समाजासाठी गेली चाळीस वर्षात प्रभाकर कवाद व त्यांच्या सहकार्‍यांचे योगदान किती आहे, हे मुंबईपासून पारनेर तालुक्यातील जनतेला चांगले माहिती आहे. तथाकथित समाजसेवक म्हणून डांगोरा पिटणार्‍यांनी सोशल मिडिया माध्यमातून बदनामी करण्यापेक्षा समोर येऊन जनतेच्या दरबारात चर्चा करावी, असे आव्हान मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी दिले.

ट्रस्टच्या चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव रामदास वरखडे संघटक अ‍ॅड बाळासाहेब लामखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, माजी सरपंच ठकाराम लंके, मळगंगा पतसंस्थेंचे माजी उपाध्यक्ष अनंतराव वरखडे, सामाजिक कार्यकर्त्या कांता लंके, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, भास्करराव वराळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल लंके आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी विषय वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्याची सूचना पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यांनी केली. उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांच्या अनुमोदनानंतर सर्व विषय मंजूर केले. ट्रस्ट अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी आपल्या भाषणात तथाकथित समाजसेवकाचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले, गेली अनेक दिवसांपासून सोशल मिडिया माध्यमातून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, मळगंगा सहकारी पतसंस्थेवर टिका होत आहे. हा तथाकथित समाजसेवक चर्चा करण्यासाठी समोर येत नाही. त्याच्यात धमकच नाही. आम्ही व आमच्या सहकार्‍यांनी गेली चाळीस वर्षात विकासकामे, सामाजिक कामे, धार्मिक शैक्षणिक कामे करताना निस्वार्थी पणे समाजात काम केले आहे, याची माहिती मुंबई पासून ते तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे आहे मात्र हा तथाकथित समाजसेवक मात्र आपण समाजसेवा करतो याचा डांगोरा पिटत सोशल मिडियावर बदनामी करीत काय साध्य करतो हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.

याचे पुर्वीचे सहकाराच्या नावाखाली काय धंदे होते आणी हा कशाप्रकारे काय करीत होता याची माहिती तमाम जनतेला चांगल्या प्रकारे माहिती असून त्याच्यात धमक असेल तर त्याने निघोजमध्ये जनतेच्या दरबारात येउन चर्चा करावी आपण चर्चा करायला तयार आहोत अशाप्रकारे त्याच्या चमच्यांमार्फत आपण अनेक वेळा निरोप दिले असून त्याने आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत म्हणून तो सोशल मिडिया माध्यमातून बोलत असून धमक असेल तर या लबाड तथाकथित समाजसेवक म्हणून डांगोरा पिटणार्‍या खोटारड्यांनी समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान कवाद यांनी दिले आहे.

विश्वस्त मंडळात १० टक्के महिलांना संधी

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात १० टक्के महिलांना संधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या कांता लंके यांनी केली यावर अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद यांनी १० टक्के महिलांना संधी देण्याची घोषणा करीत मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची निवडणूक लवकर होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असून अधिकार्‍यांनी निवडणूकीला मान्यता नाही दिली तर आपण हा विषय मुंबई येथील संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून चर्चा करुन येत्या महिनाभरात हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. सभासदांनी टाळ्या वाजवून कवाद यांचे स्वागत केले.

आक्रमक भाषणाची सर्वत्र चर्चा

निघोज येथील शरदचंद्रजी पवार साहेब अभ्यासिका सभागृहात झालेल्या या वार्षिक सभेत काय होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, यासाठी सभासद सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडी फार कडक चर्चा होत चाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न झाली असली तरी अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद यांच्या आक्रमक भाषनाची चर्चा मात्र सर्वत्र सुरू होती.

अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वागत गावोगावी मोठ्या प्रमाणात होणार असून यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने आर्थिक सहकार्य करीत तसेच मळगंगा मंदीर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर तसेच आवश्यक त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी.

भीमराव लामखडे ( माजी ग्रामपंचायत सदस्य व श्रीराम भक्त)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...