मुंबई। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाचा फेऱ्याला देखील रंगत येत आहे. दरम्यान शिंदे गटाने ठाकरे गटाला झटका दिला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्याविरोधात कोण आव्हान देणार? याबाबत संभ्रम कायम होता. अखेर आज महायुतीकडून उद्धव ठाकरे यांचे खास आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामुळे रविंद्र वायकर हे ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच रविंद्र वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.