spot_img
अहमदनगरPolitics News: नगर भाजपाची पक्षश्रेष्ठींकडे मोठी मागणी! पंकजा मुंडे यांना..

Politics News: नगर भाजपाची पक्षश्रेष्ठींकडे मोठी मागणी! पंकजा मुंडे यांना..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी अहिल्यानगर शहरातून लढवावी. नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे.

येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेत्रृत्वाला जर नगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पंकजा मुंडे यांना नगरमधून तिकीट देण्याची मागणी केली असल्याचे पत्रक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी येणारी विधानसभा निवडणूक नगर शहरातून लढवावी अशी साद घालणारे पत्रक अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे. हे पत्रक त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंदीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे.

पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्या बरोबरच शहरातल गुंडगिरीलाही लगाम त्याकाळात घातला होता. त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. मुंडे परिवाराचे नगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी.
अॅड. अभय आगरकर ( शहर जिल्हाध्यक्ष, भाजपा)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...