अहमदनगर । नगर सहयाद्री-
मित्राने धारदार शस्राने वार करत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नगरच्या श्रीरामपुरात घडली. रमेश गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. गोंधवणी परिसरात हा सिनेस्टाईल थरार घडला. याप्रकणी आकाश बबन डमके उर्फ डंग्या रा.गोंधवणी श्रीरामपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी, वॉर्ड नं.१ येथील रहिवासी रमेश गायकवाड याने आकाश बबन ढमके ऊर्फ डंग्या (रा. गोंधवणी) याला स्वतःचा होम थिएटर व स्पीकर वापरण्यास दिला होता.
दि.१८ जून रोजी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रमेश गायकवाडने दिलेला होम थेटर स्पीकर बाबत आकाश बबन ढमके उर्फ डंग्या (रा. गोंधवणी) यास विचारणा केली असता आकाश ढमके यांने हातातील कटरने रमेश गायकवाड यांच्यावर वार करत जखमी केले.
यावेळी जखमी रमेशला उपचारासाठी लोणी येथे दाखल केले. मात्र, जखमीवर उपचार सुरू असताना रमेश गायकवाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेखर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.