spot_img
आर्थिकBalaji Wafers: चंदूभाईंनीही देखील घेतली होती बजरंगबलीची प्रेरणा! 'बालाजी वेफर्स' हे नाव...

Balaji Wafers: चंदूभाईंनीही देखील घेतली होती बजरंगबलीची प्रेरणा! ‘बालाजी वेफर्स’ हे नाव कसे पडले माहीत आहे का? जाणून घ्या इतिहास..

spot_img

Balaji Wafers:1972 मध्ये, एका भारतीय शेतकऱ्याने शेतीच्या नुकसानीमुळे आपली शेती विकली आणि 10,000 रुपये त्याचा मुलगा चंदूभाई विराणीला दिले. पावसाअभावी गुजरातमध्ये भीषण दुष्काळ पडला आणि त्यामुळे चंदूभाई विराणी यांच्या वडिलांनी शेती विकणेच योग्य मानले.यानंतर चंदूभाईंनी राजकोटच्या प्रसिद्ध ॲस्ट्रॉन सिनेमासमोर बटाट्याच्या चिप्स विकायला सुरुवात केली.

चंदूभाईंनी सिनेमा हॉलसोबत आणखी दोन कॅन्टीनमध्ये चिप्स विकायला सुरुवात केली. राजकोटमधील किमान 30 व्यावसायिक सिनेमा हॉलबाहेर चंदूभाई विराणीच्या चिप्स विकत होते. हळूहळू चंदूभाई विराणी यांचा व्यवसाय विस्तारू लागल्याने चंदूभाई विराणी यांना यासाठी कारखान्याची आणि मशीनची गरज होती, त्यांच्या वडिलांनी दिलेल्या 10,000 रुपयांमध्ये त्यांनी त्यांच्या घरात एक छोटा कारखाना काढला. चंदूभाई विराणी यांच्या या कारखान्याने उत्कृष्ट चिप्स बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या समोर कारखान्याला काय नाव द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला.

हनुमान मंदिरातून घेतलेले बालाजीचे नाव
1995 मध्ये चंदूभाई विराणी यांनी बालाजी वेफर्सची स्थापना केली. बालाजी वेफर्सची सुरुवात ॲस्ट्रॉन सिनेमाच्या मागे असलेल्या बजरंगबलीच्या मंदिरापासून प्रेरणा घेऊन झाली. तोपर्यंत चिप्सची मागणी गुजरातमध्येच नाही तर देशभरात वाढू लागली होती. यानंतर बालाजी वेफर्स नमकीन आणि इतर सेगमेंटमध्येही काम करू लागले.

कर्जावर कारखाना सुरू केला
1989 मध्ये, चंदूभाई विराणी यांनी 50 लाख रुपये कर्ज घेतले आणि गुजरातमध्ये बटाटा चिप्सचा सर्वात मोठा कारखाना सुरू केला. चंदूभाई विराणी यांचा भर गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि स्वच्छता यावर होता. त्याचे परिणाम काही दिवसांतच दिसू लागले. चंदूभाई विराणी यांनी एक मोठा कारखाना काढला जिथून दर तासाला 250 किलो बटाट्याच्या चिप्स बनवल्या जाऊ शकतात. यावेळी चंदूभाई दरमहा ₹३०,००० कमवत होते आणि त्यांना हे काम पूर्णवेळ करायचे होते.

बालाजी वेफर्स प्रसिद्ध झाले
चंदूभाई विराणीचे चिप्स त्यांच्या उत्कृष्ट चवीमुळे गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध झाले. 2000 पर्यंत, बालाजी वेफर्सचा चिप्स मार्केटमध्ये 90 टक्के वाटा होता तर नमकीन मार्केटमध्ये 70 टक्के हिस्सा होता. बालाजी वेफर्सचे 100 हून अधिक वितरक, 30,000 किरकोळ विक्रेते होते, तर त्यांचा मेगा कारखाना दर तासाला 1200 किलो चिप्स तयार करत होता.

बालाजी वेफर्सची दरवर्षीची कमाई
आज बालाजी वेफर्स दरवर्षी 4000 कोटी रुपयांची कमाई करत आहे. देशभरात त्याचे चार मोठे कारखाने आहेत जिथे दररोज 6.5 दशलक्ष किलो बटाटे आणि 10 दशलक्ष किलो नमकीन बनवले जातात. चंदूभाई विराणी यांना वेफर्सचा सुलतान असेही म्हणतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...