spot_img
अहमदनगरनगरमधील दोन्ही उमेदवार महायुतीचेच!; विखेंना मताधिक्य देऊन दहशतीचे राजकारण संपवा

नगरमधील दोन्ही उमेदवार महायुतीचेच!; विखेंना मताधिक्य देऊन दहशतीचे राजकारण संपवा

spot_img

सुजय विखेंचा सक्रिय प्रचार करण्याचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांचे समर्थकांना आवाहन / नगरमध्ये महाविकास आघाडीला मोठा सुरुंग | विजय औटी यांनी वाचला नीलेश लंके व त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा पाढा!
थेट भेट / शिवाजी शिर्के
पंधरा वर्षे आमदार असताना ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिल, पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत ही माणसं माझ्याशी प्रामाणिक राहिली, त्या सर्वांना माझे अवाहन आहे की, सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा आणि पारनेर मधून मताधिय देवून दहशतीचे राजकारण संपवा. देशात लोकसभेच्या निवडणुका चालू असताना आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघात देखील निवडणूक सुरू आहे. नगर मधील प्रमुख दोन्ही उमेदवार हे महायुतीचेच आहेत. त्यातील एकाने किती पलट्या मारल्या हे सर्वश्रूत आहे. मात्र, नगरमधून लोकसभेवर जाणारा उमेदवार हा देशाचं हित सांभाळणारा, देशाचं संरक्षण धोरण समजून घेणारा हवाय! प्रशासन आणि पोलिसांना अरे-कारे करणारा नकोय! त्यांचा बाप काढणारा तर नकोच नको! हॉटेलमध्ये बसून पैसे वाटणारा उद्या लोकसभेत जाणार असेल तर लोकशाहीच्या हिताचे ते वाटत नाही आणि लोकसभेमध्ये जाऊ इच्छिणार्‍या उमेदवाराच्या हिताचं हे नाहीच नाही. त्यामुळे नगरमधील जनतेने उच्चशिक्षीत आणि देशाचं हित विचारात घेत सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे आणि त्यांना लोकसभेवर मताधिक्याने निवडून देत पारनेरमधील दहशतीचं राजकारण संपवावं असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजयराव औटी यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना केले.

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात चालू असताना नगरमध्ये नक्की काय होणार याची उत्सुकता सार्‍यांनाच लागून आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांचे होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या पारनेरमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून भूमिका बजावणार्‍या शिवसेना उबाठा गटाची भूमिका नक्की काय भूृमिका आहे हे समोर येत नव्हते. पारनेरचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी या मतदारसंघावर सलग तीनवेळा आपले प्रभुत्व सिद्ध केले. नीलेश लंके यांच्याकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर ते काहीसे शांत दिसले. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असा आशावाद औटी यांना होता. मात्र, त्या अडीच वर्षात औटी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना लंके यांच्याकडून प्रचंड त्रास झाला. औटी यांच्यासह त्यांच्या समर्थकांची त्या अडीच वर्षात कोणीच दखल घेतली नाही अशी भावना तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये वाढीस लागली. आता लोकसभा निवडणूक सुरू असताना विजय औटी हे नक्की काय भूमिका घेणार असा प्रश्न चर्चेत होता. आजारपणातून औटी हे नुकतेच बाहेर पडले असून त्यांनी मोकळेपणाने ‘नगर सह्याद्री’शी संवाद साधला.

नगर मधील दोन्ही उमेदवार महायुतीचेच, त्यातील एक पलटी मारणारा इतकेच!
पाच वर्षे खासदार असणारे महायुतीत होतेच आणि दुसरे गृहस्थ आठ- दहा महिन्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली तेव्हा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न राहता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर एक महिनाभरामध्ये त्यांनी पलटी मारली. आता महिन्याभरामध्ये पलटी मारणारा उमेदवार जो महायुतीमध्येच गेला होता ना? अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतच गेली ना? आठ महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना अस कोणते स्वप्न पडले? असा सवाल औटी यांनी उपस्थित केला आणि नगर मधील दोन्हीही उमेदवार हे महायुतीचेच असल्याचे स्पष्ट मत मांडले.

देशाच्या सुरक्षिततेबद्दल बोलण्याचा ‘त्यांचा’ अवाका किती, तीन आठवड्यांत ते यावर शब्द बोलले नाहीत!
साधारणपणे उमेदवार्‍या जाहीर होऊन जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे आणि गेले तीन आठवडे मी निवडणूक निरीक्षण केले. या पूर्ण निवडणुकीचा किंवा देशाच्या लोकसभेत जाणारा खासदार, देशाच्या संरक्षणाचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. केंद्र सरकार समोर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्यात देशाची सुरक्षितता तर देश सुरक्षित राहिला तर बाकीच्या गोष्टी आहेत हा मुद्दा महत्वाचा वाटतो. त्याच्यावर नगर मध्ये चर्चा झाल्याचं माझ्या ऐकण्यात आलेल नाही.

देशाच्या परराष्ट्र धोरणावर हे ‘सद्गृहस्थ’ बोलताना दिसत नाही, यातच तुम्ही ओळखून घ्या!
जागतिक पातळीवर रशिया- युक्रेन लढाई सुरू होऊन दीड वर्ष झाले. त्याचबरोबर इस्राईल आणि हमास युद्ध चालू आहे. इस्त्राईल आणि हमास या युद्धाचा भारताला धोका पोहोचू शकतो अशी परिस्थिती आहे. लोकसभा उमेदवाराला देशाचे परराष्ट्र धोरण समजणे महत्त्वाचे आहे. वर उल्लेख केलेल्या अत्यंत गंभीर प्रश्नावर कुठल्याही प्रकारच मतप्रदर्शन करताना हे गृहस्थ मला दिसत नसल्याचा टोला विजय औटी यांनी लगावला.

ग्रामपंचायत, सोसायटीसह प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी असभ्य मार्गाने त्रास दिला
शिवसैनिकांसह सामान्य जनतेला पारनेर तालुयात अतोनात त्रास झाला. ही भावना अनेक शिवसैनिकांनी अनेकदा माझ्याकडे आणि कालच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवली. ग्रामपंचायत, सोसायटीसह प्रत्येक निवडणुकीमध्ये जवळपास सगळ्याच गावांमध्ये स्वतः फोन करून हस्तक्षेप करत जाणीवपूर्वक प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यांचा हा त्रास सभ्यतेने झाला असता तर मी समजू शकत होतो. मात्र, तो त्रास गुंडागर्दी करून आमच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला दिला गेला.

बोलण्यासारखे खूप आहे, नक्की बोलणार!
या निवडणुकीत बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी सगळ्याच गोष्टी आता बोलणार नाही. काय क्रिया- प्रतिक्रिया येतात त्याच्यावरून मी नक्की बोलेल. मात्र, कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या मनात काही शंका- कुशंका असतील तर मला कधीही फोनवर संपर्क करा असे आवाहन विजय औटी यांनी केले.

आमचा मुख्यमंत्री व आमची सत्ता असतानाही आम्हाला प्रचंड त्रास दिला!
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पारनेर मध्ये आघाडीतील शिवसेना पक्ष व त्या पक्षाचे पदाधिकारी पारनेर मध्ये आहेत त्यांना न्याय द्यावा अस एकदाही वाटले नाही. त्यांनी आम्हाला कधीच वेळ दिला नाही. मतदार संघात वीज प्रश्न गंभीर असताना जिल्ह्याच्या वीज समितीवर रामदास भोसले यांना घ्या असं सुचवले. ते सुद्धा त्यांनी त्यावेळेला केलं नाही.

हॉटेलमध्ये बसून पैसे वाटप हे लोकसभा उमेदवाराचे चांगले लक्षण नाही
निवडणुकीतील वातावरण बिघडले असल्याचं काल परवा जाणवू लागले. हॉटेलमध्ये पैसे सापडले, वाटण्याचा प्रकार म्हणजे या वेगळ्या पद्धतीने टर्न देण्यासारखा धक्कादायक प्रकार वाटतो. हा प्रकार लोकशाहीच्या हिताचा वाटत नाही आणि लोकसभेमध्ये जाऊ इच्छिणार्‍या उमेदवाराच्या तर नाहीच नाही.

अनुभवसंपन्न खासदार हवा म्हणून विखे यांना पाठिंब्याचा निर्णय
मी स्वतः तसेच माझे सहकारी रामदास भोसले सहकारी रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे, प्रियांका खिलारी असे आम्ही साधारणतः अशा निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की येणार्‍या निवडणुकीत सुजय विखे पाटलांना मदत करावी. आम्ही पाच जणांनी एकत्रित पणाने घेतलेला हा निर्णय आहे. आम्ही घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने तालुयातल्या आम जनतेने विचारपूर्वक ज्याला लोकसभेच्या कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि अधिकची पाच वर्षे जर त्यांना मिळाली तर आणखीन एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असं आमचं मत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...