अहमदनगर | नगर सह्याद्री:-
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेतल्याने भाजपच्यावतीने नगरमध्ये निषेध नोंदवला. भाजपा व भाजपा महिला आघाडीच्यावतीने दिल्लीगेट येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध म्हणून हाताला फिती बांधून करण्यात आला.
यावेळी भाजपा सरचिटणीस सचिन पारखी, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, ओबीसी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर धिरडे, सचिन कुसळकर, सुरेखा जंगम, सविता कोटा, लीला अग्रवाल, रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, जिल्हा सचिव बंटी डापसे, राजेंद्र फुलारे, भागव फुलारे, राहुल जामगावकर, सुनील सकट, आरती सकट आदी उपस्थित होते.
प्रिया जानवे म्हणाल्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संत गजानन महाराज पालखीत जाताना अकोले जिल्हयामधील वाडेगाव येथे पायी चालले, स्टंटबाजी केली, सामान्य ओबीसी कार्यकर्त्याच्या हातून पाय धुउन घेतले याचा निषेध म्हणून भाजपच्यावतीने निषेध नोंदवत निदर्शने केली.