spot_img
अहमदनगरBhingar Arban Bank ; भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; किती...

Bhingar Arban Bank ; भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; किती जागा मिळाल्या आणि किती आहे लीड…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
Bhingar Arban Bank : भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या निवडणुकीत अनिल झोडगे, किसन चौधरी, महेश झोडगे यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या पॅनलने सर्वच्या सर्व 15 जागा जिंकल्या. विरोधी बेलेश्‍वर पॅनलचा दारून पराभव झाला. बेलेश्‍वर पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.

भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी काल (रविवार) मतदान झाले होते. त्याची आज सकाळी मतमोजणी होऊन दुपारी सर्व निकाल हाती आला. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी झाली. नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील संस्कृती लॉन येथे मतमोजणी पार पडली. 15 जागांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 10 जागा, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती भटके जमाती/विमुक्त मागास प्रवर्ग 1, अनुसूचित जाती जमाती 1, महिला राखीव 2 यांचा समावेश आहे.

भृंगऋषी पॅनलचे नेतृत्व अनिल झोडगे, किसन चौधरी, महेश झोडगे यांनी केले. तर बेलेश्‍वर पॅनलचे नेतृत्व भिंगार अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. गोपाळराव झोडगे यांचे चिरंजीव संदेश झोडगे यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे व नागरदेवळेचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी बेलेश्‍वर पॅनलच्या प्रचारात सहभाग घेतला होता. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भृंगऋषी पॅनलने सर्वच्या सर्व 15 जागा जिंकल्या आहेत. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी – सर्वसाधारण प्रवर्ग – कैलासराव खरपुडे (2825), माधव गोंधळे (2920), किसन चौधरी (31440), महेश झोडगे (3303), कैलास दळवी (2747), अमोल धाडगे (2947), राजेंद्र पतके (2793), विष्णू फुलसौंदर (2912), रूपेश भंडारी (2820), कैलास रासकर (2629), इतर मागास प्रवर्ग – अनिल झोडगे (3301), विमुक्त जाती भटके जमाती – नामदेव लंगोटे (3375), अनुसूचित जाती जमाती – एकनाथ जाधव (3174), महिला प्रवर्ग – तिलोत्तमा करांडे (2583), अनिता भुजबळ (2946). दरम्यान, या निवडणुकीत 6 हजार 989 मतदानापैकी 4 हजार 749 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...