spot_img
अहमदनगरभीम गीतांवर तरुणाईने धरला ठेका! नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

भीम गीतांवर तरुणाईने धरला ठेका! नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणाटात व लेझर शोच्या प्रकाशात तरुणांनी आंबेडकरी गीतांवर ठेका धरला.

नगर शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये एकूण १८ मंडळांनी सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित गाणी तसेच चित्रपटातील गाण्यांवर तरुण-तरुणी, महिला पुरुषांनी ठेका धरत जल्लोष केला.

पोलिस अधीक्षक राकेश ओला व अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक ओला मिरवणुकीमध्ये स्वतः हजर होते. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, प्रताप दराडे, आनंद कोकरे आदी अधिकारी बंदोबस्तात तैनात होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक २३, अंमलदार ३२३, आरसीपी प्लाटून १, एसआरपी प्लाटून १, होमगार्ड ८० असा बंदोबस्त तैनात होता.

मिरवणुकीवर ड्रोनद्वारे वॉच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त निघणा-या मिरवणुकांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात आली होती अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये १८ मंडळांची सहभाग घेतला होता. मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, मुख्य रत्यावर बॅरेकेटींग , ड्रोन कॅमॅर्‍याची नजर ठेवण्यात आली होती.

१७ डीजे जप्त
नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी विविध मंडळांनी डीजेच्या निनादात मिरवणूक काढली. मिरवणुकीतील डीजेंनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने १७ डीेजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...