पारनेर । नगर सह्याद्री
बहुचर्चित संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील संचालक भाऊसाहेब झावरे (रा. वासुंदे, ता. पारनेर) यांचे निधन झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. बुधवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे समजते.
राज्यात बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या 13 कोटी 38 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने वाारे पती पत्नीसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. यात भाऊसाहेब झावरे यांचा समावेश आहे.
संपदा पतसंस्थेच्या घोटाळ्यातील आरोपींना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास झावरे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलध्ये हलवले परंतु, हॉस्पिटमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.