spot_img
महाराष्ट्रअजय महाराज बारस्कर पोलिसांच्या ताब्यात; आज काय घडले पहा...

अजय महाराज बारस्कर पोलिसांच्या ताब्यात; आज काय घडले पहा…

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री

राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही, दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे सगे-सोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. तर, शासनस्तरावर सगेसोयरेसंदर्भाने लवकरच अंमलबजावणी होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आरक्षणाचा हा गुंता राज्यातील सर्वात जटील प्रश्न बनला आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर आता बारस्कर आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपला ठिय्या घातला असून आंदोलन सुरू केल्याचं दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओसरीवर बसले होते, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीची उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे आषाढीच्याच दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाल्याचं पाहायला मिळालं. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलीस घेत आहेत. अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने ही नेमकी जळाली की जाळली, कोणी जाळली आणि का जाळली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेतय. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं.

बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गाडी जळाल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत 1 लाखांचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला होता. त्यामध्ये, बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी देण्यात येत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...