Jio Recharge:जिओ वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिओने आपले सर्वात स्वस्त असलेले दोन प्लान बंद केले आहेत, ज्यामुळे युजर्सच्या खिशाला फटका बसणार आहे. जिओ कंपनीने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे युजर्सच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
३ जुलै २०२४ पासून रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. याचसोबत, जिओ कंपनी आपल्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बंद करणार आहे. कंपनी ३९५ रुपये आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज प्लान बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध होता.
जिओचे हे दोन्ही प्लान अनलिमिटेड डेटासह उपलब्ध होते. ३९५ रुपयांचा प्लान ८४ दिवसांचा होता, तर ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता होती. जिओचे हे रिचार्ज प्लान सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक लोक हाच रिचार्ज करायचे. परंतु आता हा रिचार्ज प्लान बंद होणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. देशभरात सर्वाधिक लोक जिओ सिम कार्डचा वापर करतात, परंतु जिओच्या या निर्णयामुळे त्यांना चांगला फटका बसला आहे.
युजर्स अजूनही प्रीपेड प्लान रिचार्ज करू शकतात, परंतु ३९५ आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज उपलब्ध नाहीत. आता जुन्या प्लानमधील फक्त १५५ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे, परंतु या रिचार्ज प्लानमधील डेटा लिमिट कमी करण्यात आली आहे. याआधी १५५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळत होता, मात्र, आता फक्त २ जीबी डेटा मिळतो. जिओनंतर आता एअरटेल कंपनीनेदेखील आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्ज प्लान २० ते २७ टक्क्यांनी वाढले आहेत.