spot_img
ब्रेकिंगहवामान खात्याची महत्त्वाची अपडेट आली रे! मान्सूनचा पाऊस 'या' तारखेला बरसणार..?

हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट आली रे! मान्सूनचा पाऊस ‘या’ तारखेला बरसणार..?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
मे महिन्यांच्या सुरवातीपासूनच हवामानामध्ये सातत्याने बदल घडत आहे. कुठे-कुठे रखरखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे तर काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अपडेट समोर आली आहे. वातावरणाचा नूर पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनचा पाऊस ‘या’ तारखेला बरसणार..?
मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये हजेरी लावतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र, यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वादळी पावसासाठी ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप-लेकाच्या नात्यांचा भयानक शेवट! मुलाने जन्मदात्या बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...

विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंचाचे काम – डॉ. विखे पाटील

  शिर्डीत युवकांचा भव्य मेळावा संपन्न शिर्डी : जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि...