Politics News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे अजितदादा गटात आगामी काळात मोठी इनकमिंग होईल असा कयास वर्तवला जात होता. परंतु लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर अजित पवार यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार:कोल्हापूरमधील माजी आमदार के.पी. पाटील हे अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते मानले जातात. माजी आमदार के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. के.पी. पाटील यांनी अलीकडेच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. त्यांचा एकूण रागरंग पाहता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आघाडीतील एका पक्षात प्रवेश करण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कारण राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे ते मविआ आघाडीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास तो अजित पवार गटासाठी मोठा धक्का ठरेल.