spot_img
देशRain update: राज्यात पुन्हा 'मुसळधार'! पाच दहा नव्हे तर 'ईतक्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: राज्यात पुन्हा ‘मुसळधार’! पाच दहा नव्हे तर ‘ईतक्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
अवकाळी पावसाने अख्ख्या महाराष्ट्राला कवेत घेतलंय. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.

‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट?
भारतीय हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...