spot_img
अहमदनगरअ‍ॅड. झावरे, चौधरी, लंके यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले! कोर्ट काय म्हणाले पहा..

अ‍ॅड. झावरे, चौधरी, लंके यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले! कोर्ट काय म्हणाले पहा..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री;
अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी लंके समर्थक अ‍ॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, दीपक लंके यांचे अटकपूर्व जामीन नगरच्या सत्र न्यायालयाने फेटाळले. दरम्यान एकूण २४ आरोपींपैकी २१ आरोपींचे जामीन सत्र न्यायालयाने कायम केले.

नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात ६ जुन रोजी गोरेगांव ता. पारनेर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी ७ जुलै रोजी महिलेने २४ आरोपींविरोधात अ‍ॅट्रसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी नगरच्या सत्र न्यायालयापुढे अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

१४ जुन रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजुर करून १ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली होती.या सुनावणीवेळी न्यायालयाने अ‍ॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी व खा. नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द ठरवून त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. तर उर्वरीत प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, संदेश झावरे यासह दोघांचे अंतरिम जामीन कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सतीश गुगळे, अ‍ॅड. अभिषेक भगत, अ‍ॅड. अरूण बनकर, अ‍ॅड गणेश कावरे, अ‍ॅड. स्नेहा झावरे यांनी काम पाहिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...