अहमदनगर | नगर सह्याद्री
अरणगाव परिसरात बाह्यवळण रस्त्यावर दोन कंटेनरचा अपघात होवू दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या परिसरात अपघाताची मालिकाच सुरु असल्याने संतप्त नागरिकांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन केले.
नगर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता करण्यात आला. परंतु, बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने आणि रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने दररोज अपघात होत आहेत. अरणगाव चौक परिसरात बाळ्यवळण रस्त्यावर दोन कंटेरनरचा मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले. दोन दिवसांपूर्वीही दोन बुलेटस्वारांचा अपघात होऊन जखमी झाले होते.
दरम्यान, वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन केले. बाह्यळवण रस्त्यावर साईपट्ट्या, दिशादर्शक फलक लावण्यात येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरुन वाहतूक होवू देणार नसल्याचा इशारा कार्ले यांनी दिला. अपघाताची माहिती समजताच नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी, रस्त्या संबंधित ठेकेदाराचे अधिकारी यांनी तत्काळ आंदोलन कर्त्यांच्या मागणी मान्य करत तातडीने रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावण्यात येतील. तसेच अरणगाव ग्रामस्थांनी गैरसोय टाळण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनात आनंदराव शेळके, पोपट पुंड, तुकाराम माट, भाऊसाहेब शिंदे, जगन्नाथ शिंदे, नामदेव शिंदे, सचिन शिंदे, सचिन शेफड, मारुती विटेकर, बाबासाहेब शिंदे, गणेश गहिले, राहुल माळवदे, गोरख गहिले, राजू शिंदे, तुकाराम शिंदे, बंडू नाट, शिवाजी नाट, राजू विटेकर, सोन्याबापू मुदळ, सुरेश नाट, रघू नाट, मोहन नाट, आप्पा शिंदे, बबन शिंदे, विजय शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.