spot_img
ब्रेकिंगहोर्डिंगबाबत आ. सत्यजीत तांबेंचा पावसाळी अधिवेशनात खडा सवाल; सरकार अशा घटनांचा गांभीर्याने...

होर्डिंगबाबत आ. सत्यजीत तांबेंचा पावसाळी अधिवेशनात खडा सवाल; सरकार अशा घटनांचा गांभीर्याने विचार कधी करणार

spot_img

होर्डिंगचा प्रश्न हा केवळ मुंबईचा नाही तर संपूर्ण राज्याचा : आ. तांबे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
मुंबईत मे महिन्यात वादळी पावसामुळे घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपाजवळ भलंमोठं होर्डिंग कोसळलं होत. त्यावेळी आडोशाला उभे असणाऱ्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. होर्डिंगचा प्रश्न हा फक्त मुंबईचाच नाही तर संपुर्ण राज्याचा आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन योग्य यंत्रणाची अंमलबजावणी कधी करणार असा संतप्त प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला.

एखादी घटना घडल्यावर आपण जागे होतो आणि त्यावर कारवाई करतो. ही घटना घडल्यानंतर शासनाने महानगरपालिका, नगरपालिकानाचं नाही तर ग्रामपंचायतींना देखील पत्र लिहून स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीकडे ग्रामसेवक नाहीत, नगरपालिकांकडे तांत्रिक काम करणारे कर्मचारी नाहीत, अशा वेळी शासन स्वतः लक्ष घालून यंत्रणांची अंमलबजावणी करणार आहे का?” असा सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात यांनी विचारला.

तसेच ग्रामसेवकांना स्ट्रक्चरल ऑडिट कसं करायचं विचारल्यावर, ते डोळ्यांनी करायचं अशी उत्तर आल्यावर जर डोळ्यांनी पाहून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असेल तर या घटनांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. फक्त मुंबईतच नाही तर राज्यात कोणत्याही भागात ही घटना घडू शकते. यासाठी स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करायला शासन काही यंत्रणांची आमलात आणणार आहे का? रेल्वेच्या जागांवरील होर्डिंगसाठी महानगरपालिकांचे नियम लागू होत नाहीत. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने कोर्टात, सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतली. यावेळी शासनाची हार झाली त्यामुळे याबाबतीत देखील शासनाने विचार करून योग्य पाऊले उचलावीत असे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

आमदार तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, होर्डिंग लावण्यापूर्वीच नियमांचे पालन केले तर अशा घटना घडणार नाहीत. शासनामार्फत ग्रामपंचायत नगरपालिका पर्यंत यंत्रणा देणे शक्य होणार नाही. यासाठी शासनावर अवलंबून राहणे योग्य नाही. महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडे स्वतःचे इंजिनिअर असतात. त्यांनी त्यांच्या सक्षम यंत्रणांचा वापर करावा. रेल्वे बाबत लवकरच सूचना देण्यात येणार आहेत. रेल्वे जरी केंद्र सरकारची असली आणि त्यांना नियम पाळणे हे बंधनकारक नसले, तरी त्यांना राज्यसरकारने सांगितलेले नियम पाळावे लागतील त्याबाबतीतच्या सूचना रेल्वेला देणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...