spot_img
अहमदनगरकुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात एक दिवसीय धरणे आंदोलन, काय दिला इशारा पहा...

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात एक दिवसीय धरणे आंदोलन, काय दिला इशारा पहा…

spot_img

आप्पा चव्हाण / श्रीगोंदा :

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार व सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कुकडी, घोड, विसापूर, सीना हक्काचे पाणी मिळवण्यासाठी, शेतकरी व विज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत व अखंडपणे मिळण्यासाठी, अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळण्यासाठी हे धरणे आंदोलन तहसील कार्यालय समोर करण्यात आले.

शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग ओढविलेला आहे. एकीकडे कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा तडाका, तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजेचा प्रश्न, यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक २७ मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घनश्याम शेलार बोलताना म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले पाहिजे. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके व फळबागे पाण्याअभावी जळाले . आता येणारे पाणी श्रीगोंद्यापासून सुरुवात झाली पाहिजे, अवकाळी मुळे जे वादळ झाले आहेत त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी, तालुक्यातील वीज व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी घनश्याम शेलार यांनी केली. तीन दिवसानंतर माणिक डोह नंतर येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येईल. तसेच पाणी पुढे सोडण्यात येईल असे आश्वासन कुकडी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार, कुकडी इरिगेशनचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळेस स्मितल भैया वाबळे, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, उत्तम आबा नागवडे, मुकुंदराव सोनटक्के, बाळासाहेब सोनवणे, अरविंद कापसे, विकास शेळके, बाबासाहेब इथापे, श्याम झरे, शरद कुदांडे, नाना शिंदे, बाळासाहेब शेलार, संजय आनंदकर, प्रवीण शेलार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी आंदोलनास उपस्थित होते.

तहसीलदार आंदोलन स्थळी न येता प्रथम नायब तहसिलदार आले असता परंतु आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. परंतु आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी तहसीलदार बाहेर या तहसीलदार बाहेर या अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदारांनी आंदोलन स्थळी येत निवेदन स्वीकारले.
सर्व मागण्या वरिष्ठांना तात्काळ कळविण्यात येतील असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...