श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
डॉक्टर महिलेकडून नर्सला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर नगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात घडली आहे. एका नामवंत डॉक्टर महिलेने केलेल्या कर्त्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ डाली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉक्टर महिलेच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: नर्स राहत असलेल्या भाड्याच्या घरात रात्री 8 च्या सुमारास संबंधित माहिला डॉक्टर यांनी येऊन ‘माझ्या नवर्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस’ असा जाब विचारला त्यावेळी पिडीत महिलेने डॉक्टर महिलेला सांगितले की, ‘माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. मी कशाला मॅसेज करू‘ असे सांगत असताना तिने हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून नर्सच्या कपाळावर, डोक्यात, डाव्या हाताच्या मनगटाजवळ, उजव्या पायाच्या गुडघ्यावर, गजाने मारहाण करून तिला जखमी केले.
तसेच केस धरून तिला खाली पाडले व गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. पुन्हा जर नादी लागली तर तुला फाशी देऊन जीवे मारेन आणि गावात राहिली तर तुला सुपारी देऊन मारून टाकील तसेच तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही. अशी धमकी दिली. एका डॉक्टर महिलेने थेट लोखंडी गजाने घरात घुसून एका महिलेला मारहाण करणे कितपत योग्य आहे? मारहाण करतानाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.