पारनेर | नगर सह्याद्री
महानगर बँकेचे दिवंगत अध्यक्ष उदय दादा शेळके यांनी सुवर्ण महोत्सव कार्यकाळात जीएस महानगर बँकेचा एनपीए शुन्य टक्के करण्याचा मानस बोलुन दाखविला होता. ते स्वप्न चालू आर्थिक वर्षात साकार झाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा सहकारी बँक व महानगर बँकेच्या संचालिका गीतांजलीताई शेळके यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बँकेच्या इतिहासात हे दैदिप्यमान यश मिळाले असून कर्मचार्यांनी संचालिका गीतांजलीताई शेळके यांचा सन्मान करत आनंदोत्सव साजरा केला.
जी एस महानगर बँकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा ३४ कोटी रूपये झाला असुन नेट एनपीए शून्य टक्के झाला आहे. जीएस महानगर बँकेचा ५० व्या वर्षानिमित्त मी माझ्या संस्थेचा झिरो एनपीए करून दाखवणार हा निश्चय केला होता आणि आज खर्या अर्थाने उदय दादांचे स्वप्न साकार झालेले आहे. पण ह्या आनंदामध्ये दादा आपल्या मध्ये नाही याची फार मोठी उणीव भासत आहे अशी खंतही संचालिका गीतांजलीताई शेळके यांनी व्यक्त केली.
दिवंगत अध्यक्ष उदय शेळके नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगायचे की माझ्या संस्थेतला कर्मचारी जरी कमी शिकलेला असेल पण तो प्रामाणिक आहे. आज खर्या अर्थाने आपल्या सर्वांना दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण हे दादांचे स्वप्न होतं. माझ्या बँकेचे सुवर्ण महोत्सव वर्षांमध्ये पदार्पण होत असताना मी बँकेचा झिरो एनपीए करणार म्हणजे करणार हे दादांचे वाय आज खरं ठरलं.
या यशामागे साहेबांनी सर्व कर्मचार्यांना दिलेली शिस्त आणि प्रामाणिकपणामुळे भरघोस नफ्यामुळे बँकेच्या इतिहासात हे दैदिप्यमान यश प्राप्त झाल्याबद्दल बँकेच्या संचालिका श्रीमती गीतांजलीताई उदयदादा शेळके यांनी वरिष्ठ अधिकारी व सर्व कर्मचार्यांचे तसेच को ऑप बँक कर्मचारी संघटनेचे मनपुर्वक अभिनंदन केले.
बँकेचे कार्यकारी संचालक एम. टी. कांचन तसेच सरव्यवस्थापक सर्वस्वी पुनित शेट्टी, वासुदेव गुरम, ज्ञानदेव मते, व पाटील साहेब यांच्यासह सर व्यवस्थापक संतोष गुंड, शेटे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्य कार्यालयातील सर्व विभाग व लालबाग शाखेतील सर्व कर्मचारी वर्गाला पेढे वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला.