spot_img
ब्रेकिंगमहाआघाडी, महायुतीत जागा वाटपाचे घोडे अडले? महायुतीत ९ तर आघाडीमध्ये 'इतक्या' जागांवरून...

महाआघाडी, महायुतीत जागा वाटपाचे घोडे अडले? महायुतीत ९ तर आघाडीमध्ये ‘इतक्या’ जागांवरून खडाखडी

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री-
देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीचे ९ जागांवरून जागावाटपाचे घोडे अडले आहे. त्यामुळे या रणधुमाळीत जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीने महायुतीवर सरशी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार घोषित करायचे बाकी आहेत. तर महायुतीचा ९ जागांचा तिढा कायम आहे. या जागांवरील दावे प्रतीदाव्यांमुुळे जागा वाटप रखडले आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता लोकांमध्ये वाढू लागली आहे. राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राता सभांचा धडाका लावला आहे. मात्र, महाविकास आघाडीचा ९ जागांचा गुंता कायम आहे.

महाविकास आघाडीने फक्त तीन उमेदवार घोषित करणे बाकी आहे. या तीन जागांवरील उमेदवारांपैकी दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा पवार गटाची आहे. या जागांमध्ये माढा, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिक्षेच्या यादीत आहे. दुसरीकडे महायुतीत ९ जागांवरील तिढा कायम आहे. कुठल्या जागा कोणी लढवायच्या, यावरून महायुतीत वाद असल्याचे समोर आले आहे.

महायुतीतील ९ मतदारसंघाच्या ९ मतदारसंघाच्या अजूनही चर्चा सुरु राहील. या ९ जागांमध्ये ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...