spot_img
आर्थिकPineapple: ‘अशा’ पद्धतीने करा अननसाची शेती, एका हेक्टरमध्ये 30 टन उत्पादन? वाचा...

Pineapple: ‘अशा’ पद्धतीने करा अननसाची शेती, एका हेक्टरमध्ये 30 टन उत्पादन? वाचा सविस्तर

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
आता शेतीतील काळ बदलण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी आता विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून कृषी व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत. तेच- तेच पिके घेतल्यामुळे अनेकदा बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नाही. पारंपरिक पिकांच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नाविन्यपूर्ण पिके घेत शेतीकडे वळण्याची गरज आहे. तुम्हाला आम्ही या लेखात अननसाच्या लागवडीबाबत माहिती देणार आहोत.

अननस पिकाचा कालावधी 
अननसाच्या लागवडीपासून ते फळ पिकवण्यापर्यंत सुमारे १८ ते २० महिन्यांचा कालावधी लागतो. फळ पिकल्यावर त्याचा रंग लाल-पिवळा होऊ लागतो. त्यानंतर त्याच्या तोडणाची प्रक्रिया सुरू होते.

अननस खाण्याचे अनेक फायदे
अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. भूक वाढवण्यापासून तर पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. बाजारात त्याची मागणी वर्षभर असते. त्याच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती वर्षातून अनेकवेळा करता येते. तज्ज्ञांच्या मते हे उष्ण हवामानातील पीक मानले जाते. मात्र त्याची लागवड वर्षातून केव्हाही करता येते.

व्यवस्थापन सोपे आहे
अननस वनस्पती कॅक्टस प्रजातीची आहे. त्याची देखभाल आणि व्यवस्थापनही अतिशय सोपे आहे. अननस पिकाला इतर वनस्पतींच्या तुलनेत कमी सिंचनाची आवश्यकता असते. त्यासाठी शेतात तण साचणार नाही याची काळजी घ्यावी.

झाडांना सावलीची गरज
अननसाच्या झाडांना फारशी काळजी घ्यावी लागत नाही, कारण पाण्याची गरज कमी असते. अननसाच्या झाडांना सावलीची गरज असते. शेतात काही अंतरावर रोपे लावण्याची गरज आहे. खतासाठी डीएपी, पोटॅश आणि माइल्ड सुपर युरिया ची आवश्यकता असते. अननसासोबतच तुम्ही आंतरपीक देखील घेऊ शकता.

हेक्टरी लाखो रुपयांचा नफा
अननसाच्या झाडाला एकदाच फळ येते. एका लॉटमध्ये एकदाच अननस मिळू शकतं. त्यानंतर दुसऱ्या लॉटसाठी पुन्हा पीक घ्यावे लागते. बाजारात हे फळ सुमारे 150 से 200 रुपये किलोदराने विकले जाते. शेतकऱ्यांनी 1 हेक्टरमध्ये 30 टन उत्पादन घेतले तरच लाखोंचे उत्पादन मिळू शकते.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इच्छुक अर्धाडझन तरीही श्रीगोंदेकरांमध्ये ‌‘सेटलमेंटचं सेंटीमेंट‌’

बबनराव पाचपुते विरोधकांमध्ये ‌‘भलतीच‌’ स्पर्धा | दबावतंत्रात टेंडर वाढवून घेतलं जात असल्याची जाहीर चर्चा...

नगरकरांना खुशखबर; आमदार संग्राम जगताप यांना नवरात्रात देवी पावली, २० कोटी मंजूर…

सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार...; खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी मंजूर अहमदनगर | नगर...

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून...

आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय…!; केडगाव, बुर्‍हाणनगरला देवीचा जागर

अहमदनगर । नगर सहयाद्री:- बुर्‍हाणनगर ता.नगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त...