महिलेला समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.
पुणे । नगर सह्याद्री
महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सचिन यशवंत शिंदे ( ४३ ) याला अटक केली आहे. महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी शिंदे आणि फिर्यादी महिला ओळखीचे होते. या महिलेला शिंदे यांनी वारजे परिसरात भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिल्याने महिलेला चक्कर आली. त्यानंतर शिंदे यांनी तिचे मोबाइलवर छायाचित्रे काढली.
महिलेला समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेला धमकावल्याने व जातीवाचक शिवीगाळ केल्याने महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.
COMMENTS