घडलेला प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला.
पुणे । नगर सह्याद्री
पती-पत्नीच्या गप्पा सुरु असताना पत्नी पाय हालवत होती. त्यावेळी पत्नीला पाय हलवू नको असे सांगितल्यावर पत्नी म्हणाली मी तुमचे पाय बांधते, तुम्हाला बसता येईल का? असे म्हणत पतीचे पाय बांधले. त्यानंतर पत्नीने हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावली. डोळ्यावर कपडा बांधला त्यानंतर पतीच्या हातावर, गळ्यावर वार करत खून करण्याचा प्रयत्न केला.
घडलेला प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयसिंह शहाजी गायकवाड ( २८ ) असे जखमी पतीचे नाव आहे. पतीने पत्नीविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पाय हलवू नको असे पत्नीला बजावल्याने त्याचा पत्नीला राग आला.
काही वेळाने पत्नीने विजयसिंह यांना मी तुमचे पाय बांधते तुम्ही तसे बसून दाखवा असे म्हणत पतीचे पाय दोरीने बांधले व तोंडावर चिकट टेप लावली. कपड्याने डोळे बांधत त्यांच्या छातीवर बसून गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पत्नीविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
COMMENTS