याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पुणे । नगर सह्याद्री
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार लोहगावमधील संतनगर येथे समोर आला आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (३५) यांना विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बबिता आशिष भोसले (३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. भोसले दाम्पत्य लोहगाव भागातील संतनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. आशिष हा सफाई कामगार असून गेल्या काही महिन्यांपासून पत्नी रूपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करत होता.शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाल्याने पतीने स्वयंपाकघरातील चाकूने रूपालीवर वार केले.
घटनेची माहिती शेजाऱ्याला मिळताच रूपालीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आशिष विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय धामणे करत आहेत.
COMMENTS