शेती नावावर करून, पाच लाख रूपये व दागिने द्यावे लागतील अशी बोलणी झाल्याने विवाहाचा मुहूर्त ठरला.
कडा । नगर सह्याद्री
जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सने आष्टीतील एका तरुणाला काही जमिनीसह साडे नऊ लाख रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या तरुणीचे पहिले दोन विवाह झाले असून देखील तिसरा विवाह केला. लग्नानंतरही प्रेमसंबंध ठेवल्यामुळे तरूणाने पोलिस ठाणे गाठून तरुणीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
बिभीषण पडोळे याचे आष्टी शहरात मेडिकल आहे. जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत असणारी तरुणीशी तुझे लग्न लावुन देऊ असे म्हणून भगवान धुमाळ, ईश्वर मुटकुळे यांनी दिनेशचा तरुणीशी विवाह लावून देण्याचे अमिश दाखवले. त्यानंतर शेती नावावर करून, पाच लाख रूपये व दागिने द्यावे लागतील अशी बोलणी झाल्याने विवाहाचा मुहूर्त ठरला. त्या आगोदर दिनेशने एक एकर शेती बिभीषण यांच्या नावे केली. तसेच नर्स शारदा आर्सूळ हिच्या बँक खात्यात पाच लाख रूपये आरटीएजीस केले. त्यानंतरच ठरल्याप्रमाणे कपिधार येथे लग्न झाले.
विवाहानंतर काही दिवसांनी दिनेश कामानिमित्त बाहेर जात असे. त्यानंतर बिभीषण घरी यायचा. शारदा आणि बिभीषण यांना दिनेशने एका खोलीत रंगेहाथ पकडले. त्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण उघडकीस आले. त्यानंतर जमिन, पैसे परत देतो म्हणल्याने दिनेश शांत राहिला. परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दिनेशने सोमवारी आष्टी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यावरून शारदा विठ्ठल आरसुळ, बिभीषण आण्णासाहेब पडोळे, भगवान दत्तुबा धुमाळ, ईश्वर महादेव मुटकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
COMMENTS