रविवारी दुपारी त्याचा पत्नीशी वाद झाल्याने हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. यावेळी पत्नी बेशुद्ध झाली आणि जमिनीवर कोसळली.
मुंबई । नगर सह्याद्री
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीला मारहाण केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घडलेली घटना रविवारी दुपारी घडली असून घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
रणजीत देवेंद्र ( २२ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रणजीत देवेंद्रहे त्यांच्या पत्नीसह मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील स्थायिक असून ते डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. रविवारी दुपारी त्याचा पत्नीशी वाद झाल्याने हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. यावेळी पत्नी बेशुद्ध झाली आणि जमिनीवर कोसळली.
पत्नी बेशुद्ध पडलेले पाहून घाबरलेल्या रणजीतने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला शुद्ध येताच रणजीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS