आकाश याने गाडेकर मळ्यातील घरी जाऊन दरवाजाच्या फटीतून बघितले त्यावेळी मनालीने गळफास घेतल्याचे समोर आले.
नाशिक । नगर सह्याद्री
सामनगावरोडवरील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय विवाहितेने पतीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिवलेने राहत्या घरामध्ये गळफास घेतला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता मनाली प्रसाद गवळी यांनी शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रसाद संजय गवळी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. त्यावेळी मनाली हिने त्यांना सांगितले की मी आत्महत्या करीत आहे. यानंतर प्रसाद गवळी हे बाहेर असल्याने त्यांनी तातडीने मनालीचा मानलेला भाऊ आकाश मोरे याच्याशी संपर्क साधून मनालीविषयी माहिती दिली.
आकाश याने गाडेकर मळ्यातील घरी जाऊन दरवाजाच्या फटीतून बघितले त्यावेळी मनालीने गळफास घेतल्याचे समोर आले. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतमधून बंद केल्याने त्वरित नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलीस नाईक पाटील हे अधिक तपास करत आहेत.
COMMENTS