याप्रकरणी अमित गजानन गाठे (२९) या तरुणाविरोधात यशोधरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नागपूर । नगर सह्याद्री
विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओडून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुनानाने महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत दोन वर्ष लैंगिक शोषण केले. याप्रकरणी अमित गजानन गाठे (२९) या तरुणाविरोधात यशोधरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
विधवा महिला तिच्या पतीच्या निधनानंतर तिच्या आईवडिलांसह राहते. आरोपी अमित गाठे हा अभियंता असून नागपुरमध्ये एका कंपनीत नोकरी करतो. महिला विधवा असल्याने त्यांनी तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर घरी कोणी नसताना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केली.
गेल्या दोन वर्ष लैंगिक शोषण करून त्याने लग्न करण्यास नकार देत नातेवाईक तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
COMMENTS