बालिकेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पुणे । नगर सह्याद्री
चार वर्षाच्या तरुणीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणास कोथरूड पोलीसांनी अटक केली आहे. घडलेला प्रकार कोथरूड परिसरामध्ये घडला. राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर काॅलनी, बोराटे चाळ, कोथरुड) या तरुणास अटक करण्यात आली आहे.
बालिकेच्या आजोबांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. चार वर्षाची तरुणी घरासमोरील अंगणात खेळत असताना चोरगे यांनी मुलीला बागेमध्ये फिरायला घेऊन जातो असे सांगून घेऊन गेले. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात लावलेल्या बसजवळ बालिकेला घेऊन गेल्यावर अंधारात तिच्याशी अश्लील कृत्य केले.
मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर आजोबा तिथे गेले. परिसरातील रहिवाशी आणि आजोबांनी चोरगेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
COMMENTS