अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते.
बिहार । नगर सह्याद्री
बिहारचे मुख्यामंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमात उद्घाटन करत करत असताना पार घसरून पडल्याचं पहायला मिळतंय. शिक्षक दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा करण्यात येतो.
अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या समावेत राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर देखील उपस्थित होते. शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम पार पडल्यानंत व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री गेले त्यावेळी उद्घाटनासाठी फलकावरील पडद्याजवळ येताच त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले.
उपस्थित असलेल्या बॉडीगार्डने त्यांना उचललं परंतु मुख्यमंत्री पडल्याचं पाहताच गोंधळ सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी हसत हसत आपण ठिक असल्याची कल्पना त्यांनी दिली. परंतु सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
COMMENTS