आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यानी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
जळगाव । नगर सह्याद्री
तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार १७ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान वडील मुलाला खोलीत उठवायला गेल्यावर समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील वडिलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करीत होता. काल रात्री तेजसने कुटुंबियांसोबत जेवण केल्यावर झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेल्यावर त्यांना हा प्रकार पाहून धक्का बसला.
आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यानी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास पोकॉ सदाब सय्यद करीत आहेत.
COMMENTS