गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर जमा झाला होता.
परभणी । नगर सह्याद्री
परभणीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान राडा झाल्याचे समोर आले आहे. हा कार्यक्रम संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंतु काही तरुणांनी हुल्लडबाजी करत मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. स्टेडियमवरच गोंधळ झाल्याने तरुणांनी खुर्च्याची तोडफोड, धक्काबुकी झाल्याने पोलीसांनी कार्यक्रमाप्रसंगी लाठीमार केला.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर जमा झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यावेळी गौतमीचे स्टेजवर आगमन झाल्यानंतर स्टेजवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. त्याठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालत असल्याने पोलीसांनी त्या ठिकाणी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणांमध्ये गोंधळ वाढल्याने एकमेकांना खुच्या फेकून हाणामारी झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीसांनी हस्तक्षेप करत लाठीमार सुरु केल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर गौतमी पाटीलचा कार्यक्रम थांबविण्यात येऊन तरुणांना स्टेडिअमच्या बाहेर काढण्यात आले.
COMMENTS