रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग आलिया भट्टने राहा हिच्या जन्मानंतर केले.
मुंबई । नगर सह्याद्री
आलिया भट्ट ही काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही आलिया भट्ट रणवीर सिंह दिसले होते. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाने धमाल केली. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग आलिया भट्टने राहा हिच्या जन्मानंतर केले.
विशेष म्हणजे कश्मीर येथे शूटिंगसाठी राहा हिला देखील आलिया घेऊन गेली. रॉकी और रानी की प्रेम या चित्रपटाने चित्रपटगृहावर बक्कळ अशी कमाई केली. या चित्रपटाचे प्रमोशन करताना करण जोहर देखील दिसला. जया बच्चन देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसल्या. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. विशेष बाब म्हणजे आलिया भट्ट ही कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
आलिया भट्ट ही सध्या तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. आलिया भट्ट या व्हिडीओमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसतंय. या व्हिडीओची विशेष बाब म्हणजे रणबीर कपूर किंवा राहा यांच्यासोबत आलिया भट्ट ही सुट्टी घालवत नाही. अनेकदा असे होते की आपण आपल्या कुटुंबियांना अधिक वेळ देतो. मात्र, आलिया भट्ट ही अपवाद ठरली आहे. आलिया भट्ट ही रणबीर कपूर आणि राहा यांना सोडून चक्क आपला सुट्टीचा दिवस स्विमिंग पूलमध्ये घालवताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ही स्विमिंग करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत आलिया भट्ट हिने लिहिले की, माझ्या सुट्टीचे शेड्युल. आलिया भट्ट ही काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खानच्या घरी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी आलिया भट्ट हिच्यासोबत राहा देखील होती. यावेळी आपल्या मुलीचा चेहरा लपवताना आलिया भट्ट ही दिसली. आलिया भट्ट हिने तिच्या मुलीची एकही झलक चाहत्यांना दाखवली नाहीये. परंतु काही दिवसांपूर्वी मुलीच्या नावाच अर्थ सांगणारी तिने एक पोस्ट शेअर केली.
COMMENTS